एएम इंटेलिजन्स लॅब्ससोबत खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या बैठकांचे फलित
मुंबई | १५ मे :
मुंबई महानगर क्षेत्रात ५०० MW क्षमतेचा ‘ग्रीन एआय कॉम्प्युट हब’ आणि डेटा सेंटर पार्क निर्मितीसाठी एएम इंटेलिजन्स लॅब्ससोबत झालेला १.१४ लाख कोटींचा करार हा शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्याचे यश आहे, असे प्रतिपादन राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज केले. एक्सवरील पोस्टमध्ये मंत्री सामंत यांनी खासदार डॉ. शिंदे यांचे आभार मानले. (“₹1.14 Lakh Crore Investment in Maharashtra Through the Initiative of MP Dr. Shrikant Shinde,” says Industries Minister Uday Samant)
उद्योग क्षेत्रात तंत्रज्ञानाचा आणि ‘इंटेलिजन्स’चा प्रभावी वापर करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही एमएमआर क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्यासाठी प्रयत्न केले. खासदार डॉ. शिंदे यांच्या विशेष निमंत्रणावरून एएम इंटेलिजन्स लॅब्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसोबत महाराष्ट्र शासनाने १.१४ लाख कोटींचा (१२ अब्ज डॉलर्स) सामंजस्य करार केला. खासदार डॉ. शिंदे यांनी मुंबई आणि नवी दिल्लीत घेतलेल्या सातत्यपूर्ण बैठका व पाठपुराव्याचे हे यश आहे, असे मंत्री सामंत यांनी म्हटले आहे.
या गुंतवणूक करारामुळे मुंबई महानगर क्षेत्रात ५०० MW क्षमतेचा ‘ग्रीन एआय कॉम्प्युट हब’ आणि डेटा सेंटर पार्क उभारले जाणार आहे. यामुळे येथे २,००० ते ३,००० पेक्षा जास्त उच्च-तंत्रज्ञान रोजगारांची निर्मिती होईल. २४ तास नवीकरणीय ऊर्जेवर चालणारा हा देशातील अग्रगण्य प्रकल्प ठरेल, असा विश्वास मंत्री सामंत यांनी यावेळी व्यक्त केला. महाराष्ट्राला देशाची ‘डिजिटल आणि एआय राजधानी’ बनवण्याच्या दिशेने उचललेले हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे, असे ते म्हणाले.

