Site icon LNN

वंदे मातरम् राष्ट्रगीताला १५० वर्षे पूर्ण; कल्याणातील बालक मंदिर संस्थेतर्फे भव्य उपक्रमाचे आयोजन

कल्याण दि.7 नोव्हेंबर :
वंदे मातरम् या राष्ट्रगीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कल्याण येथील नामांकित बालक मंदिर संस्थेतर्फे एक विशेष उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत संपूर्ण वंदे मातरम् गीताचे सामूहिक गायन करण्यात आले. (150 years of Vande Mataram national anthem; grand event organized by Balak Mandir Sanstha in Kalyan)

येथील नमस्कार मंडळ मैदानात झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी बालक मंदिर संस्थेच्या पूर्व प्राथमिक, प्राथमिक तसेच इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते. देशभक्तीने ओथंबलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी एकसुरात वंदे मातरम् चा नारा देऊन वातावरण भारावून गेले होते.

कार्यक्रमाला भाजपचे माजी शहराध्यक्ष वरुण पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ. चंद्रशेखर तांबडे, भाजप कल्याण मंडळ अध्यक्ष रितेश फडके, भाजप प्रदेश सचिव प्रिया शर्मा, रमेश गोरे (उपकार्याध्यक्ष, बालक मंदिर संस्था), माळींजकर मॅडम (शालेय समिती, बालक मंदिर संस्था), मुख्याध्यापक ओक हायस्कूल दिलीप तडवी, मुख्याध्यापक बालक मंदिर प्राथमिक शाळा कल्पना पवार, इंग्रजी माध्यम प्राथमिक शाळेच्या ठाकरे मॅडम, माध्यमिक शाळेच्या कांचन मॅडम तसेच इंग्रजी माध्यमाचे जाधव सर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना जागविण्यासोबतच राष्ट्रगीताच्या १५० वर्षांच्या गौरवशाली परंपरेचे स्मरण करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या या सहभागाचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश बळकट होत असल्याचे मत व्यक्त केले.

Exit mobile version