Home कोरोना ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 1ली ते 4थीचे वर्ग १५ डिसेंबरपासून – जिल्हाधिकारी...

ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 1ली ते 4थीचे वर्ग १५ डिसेंबरपासून – जिल्हाधिकारी कार्यालयाचे आदेश

 

तर ग्रामीण भागात ४ ऑक्टोबर २०२१ पासून सुरू होणारे 5वी ते 12वी आणि शहरी भागात 8वी ते 12वीचे वर्ग नियमित सुरू राहणार

ठाणे दि. 1 डिसेंबर :
कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतच्या सर्व शाळा १ डिसेंबर ऐवजी १५ डिसेंबरपासून सुरू करण्याचे आदेश अपर जिल्हाधिकारी वैदेही रानडे यांनी दिले आहेत. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील इयत्ता पहिली ते चौथीसह नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रातील पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा १४ डिसेंबर २०२१ पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. मात्र ग्रामीण भागात ४ ऑक्टोबर २०२१ पासून सुरू असलेले पाचवी ते बारावी आणि शहरी भागातील इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग नियमित सुरू राहतील असेही ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

कल्याण डोंबिवली क्षेत्रातील शाळा सुरू करण्याबाबत आज होणार निर्णय…

 

 

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा