Home ठळक बातम्या कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी डोंबिवलीतुन 200 बसेस; खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा पुढाकार

कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी डोंबिवलीतुन 200 बसेस; खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा पुढाकार

 

डोंबिवली, दि. 9 सप्टेंबर :

गणेशोत्सव आणि कोकणवासियांचे अतूट नाते. काहीही झाले तरी चाकरमानी कोकणात गणेशोत्सवासाठी येणारच. मात्र कोरोनामूळे आलेल्या आर्थिक संकटातही चाकरमान्यांची ही कोकणवारी सुरू राहावी यासाठी शिवसेनेतर्फे डोंबिवली, कल्याणातून तब्बल 200 मोफत एसटी बसेस सोडण्यात आल्या. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून ही मोफत बससेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

कल्याण लोकसभा मतदार संघातील डोंबिवली आणि कल्याणातून विविध ठिकाणाहून महाड ते सावंतवाडी असे एकूण 200 बसेस काल संध्याकाळी 6 वाजता खासदार डॉ. शिंदे यांच्या हस्ते झेंडा दाखवून रवाना करण्यात आल्या. महाड, मंडणगड- दापोली, श्रीवर्धन, खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर खारेपाटण, कणकवली, मालवण, देवगड, सावंतवाडी अशा तेरा ठिकाणी या बसेस रवाना झाल्या. डोंबिवली पूर्वेच्या डीएनसी रोड, आयरे गाव, पिंपळेश्वर मंदिर, पी अँड टी रोड, ठाकुर्ली 90 फिट पश्चिमेच्या गावदेवी, मोठा गाव, श्रीधर म्हात्रे चौक, गोपीनाथ चौक,उमेश नगर आदी ठिकाणाहून या बसेस सोडण्यात आल्या .

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेने चाकरमानी मेटाकूटीला आला आहे. तसेच कोकणावर अतिवृष्टीने मोठे संकट ओढावले असून अनेकांचे रोजगार हिरावले गेले आहेत. तर काहींचे उद्योग व्यवसाय बंद असल्याने आर्थिक संकट कोसळले आहे. अशा परिस्थिती गणेशोत्सवात गावाकडे जाण्यासाठी अनेकांची आर्थिक कुचंबणा होत आहे. यामुळे शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून ही मोफत बससेवा उपलब्ध करुन देण्यात आली. यावेळी शहरप्रमुख राजेश मोरे, नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख भाऊ चौधरी, माजी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे, मनोज रमेश म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

मागील लेखकेडीएमसीतर्फे कल्याण डोंबिवलीत उद्या (9 सप्टेंबर) 37 ठिकाणी लसीकरण
पुढील लेखआगामी केडीएमसी निवडणुकीत मनसे निर्णायक स्थितीत असणार – मनसे आमदार राजू पाटील

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा