डोंबिवली दि .5 सप्टेंबर:
कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्वासाठी गावी जाणाऱ्या भाविकांसाठी मोफत बससेवेचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान आज बुधवारी कल्याण ग्रामीण, डोंबिवली शहर आणि उल्हासनगर येथून कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये २३३ हुन अधिक बस रवाना करण्यात आल्या. खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांचा सध्या पश्चिम महाराष्ट्र्रात जनसंवाद दौरा सुरु असून यावेळी त्यांनी सांगली येथून ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातुन सर्व बसला भगवा झेंडा दाखवून बस मार्गस्थ केल्या. यावेळी सर्व गणेश भक्तांनी मोफत बससेवेबद्दल खासदार डॉ.शिंदे यांचे आभार मानले. तर उद्या गुरुवारी दिवा, कल्याण पूर्व आणि अंबरनाथ येथून सुमारे २९१ हुन अधिक बस गणेशोत्सवासाठी रवाना करण्यात येणार आहेत.
गणेशोत्सव म्हणजे सर्व नागरिकांसाठी एक आनंदाचा आणि उत्साहाचा सोहळा. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली तसेच अंबरनाथ, उल्हासनगर येथून मोठ्या संख्येने भाविक गणेशोत्सवासाठी गावी जात असतात. यामध्ये कोकणात जाणाऱ्या भाविकांची संख्या अधिक असते. याच पार्श्वभूमीवर दरवर्षी प्रमाणे कोकणात तसेच पश्चिम महाराष्ट्रात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या वतीने दरवर्षी मोठ्या संख्येने बस सोडण्यात येत असतात. यामुळे सर्व भाविकांना कोणत्याही गर्दीचा सामना न करता आपल्या गावी सुखरूप जात येते. यंदाही गणेशोत्सवात गावी जाणाऱ्या भाविकासांठी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून मोफत बस सेवा उपलब्ध करून दिली आहे.
यामध्ये सिंधुदुर्ग, मालवण, रत्नागिरी, लांजा, खेड, चिपळूण, कुडाळ, मंडणगड, महाड, श्रीवर्धन, पोलादपूर, चंदगड यांसह कोकणातील विविध ठिकाणी बस रवाना करण्यात आल्या. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये देखील बस रवाना करण्यात आल्या. खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांचा सध्या पश्चिम महाराष्ट्र्रात जनसंवाद दौरा सुरु असून यावेळी त्यांनी सांगली येथून ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातुन सुमारे २३३ बसला भगवा झेंडा दाखवून बस मार्गस्थ केल्या. यावेळी सर्व गणेश भक्तांनी मोफत बससेवेबद्दल खासदार डॉ.शिंदे यांचे आभार मानले.
तर खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी सर्व गणेशभक्तांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देत सुखरूप प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच या मोफत बससेवा उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, युवासेना सचिव दीपेश म्हात्रे, उपजिल्हा प्रमुख राजेश कदम, शहरप्रमुख राजेश मोरे, रवी पाटील यांच्यसह शिवसेनेचे संतोष चव्हाण, नितीन पाटील यांच्यासह सर्व स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी आभार ही मानले.