Home ठळक बातम्या ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेमध्ये 74 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात

ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेमध्ये 74 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात

कल्याण दि. २६ जानेवारी :

७४ व्या प्रजासत्ताक दिन जिल्हा परिषद शाळा वाघेरेपाडा येथे मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. एकीकडे खासगी आणि मोठ्या शाळेतील कार्यक्रम तर दुसरीकडे तोकडी साधने असणारी जिल्हा परिषद शाळा. मात्र त्यातही जे आहे त्यात उत्तम करण्याचा ध्यास घेऊन या जिल्हा परिषद शाळेमध्ये लेझिम, नृत्य, समूह गायन, भाषण आदी माध्यमांतून हा प्रजासत्ताक दिन साजरा झाला. (74th Republic Day celebrations in Zilla Parishad school in rural areas)

देशभक्तीपर गाण्यावर मुलांनी तालबद्ध सादर केलेले लेझिम हे या शाळेतील प्रजासत्ताक दिनाचे वैशिष्ट्य ठरले. आदिवासी आणि ग्रामीण भागातील ही सर्व मुले इतरांपेक्षा आम्हीही काही कमी नाही,आम्हाला संधी द्या असेच त्यांच्या कृतीतून सांगत होती. घरात असतील तसे कपडे घालून वेश करून न घाबरता या मुलांनी केलेलं सादरीकरण अत्यंत उत्तम होते. शाळेतील शिक्षिका आशा शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली या मुलांनी हे सर्व सादरीकरण तयार केले.

तर मोबाईलपासून मुलांना दूर ठेवण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्ते विशाल जाधव यांनी यावेळी पालकांना केले. तसेच मुलांना फक्त शाळेत सोडून आपली जबाबदारी संपत नसून शाळेतील सर्व कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासही त्यांनी सांगितले. प्रजासत्ताक दिनाचा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व ग्रामस्थ आणि तरुणांनीही विशेष मेहनत घेतली होती.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा