Home ठळक बातम्या कल्याणातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानासाठी 85 वर्षांच्या लढवय्या आजीबाईंचे उपोषण

कल्याणातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानासाठी 85 वर्षांच्या लढवय्या आजीबाईंचे उपोषण

कल्याण दि.20 नोव्हेंबर :
केडीएमसीच्या प्रस्तावित स्मार्ट सिटी प्रकल्पामध्ये कल्याण स्टेशन परिसरात असणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान बाधित होणार असून ते वाचवण्यासाठी 85 वर्षीय लढवय्या आजीबाईंनी कंबर कसली आहे. लक्ष्मीबाई मारुति ससाणे असे या आजीबाईंचे नाव असून त्यांनी या उद्यानातच उपोषण सुरू केले आहे.

कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिकच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत स्टेशन परिसराचा विकास केला जात आहे. त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून या प्रकल्पात डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानही बाधित होत आहे. ते वाचवण्यासाठी काही दिवसांपूर्वीच राबवण्यात आलेल्या सह्या आणि हरकतींच्या मोहीमेला जोरदार प्रतिसाद मिळाला. त्यापाठोपाठ आता या 85 वर्षांच्या लढवय्या आजीबाईनींही हे उद्यान वाचवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. उपोषणाच्या माध्यमातून त्यांनी या कामाला विरोध केला असून आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. 1974 च्या काळात मुरबाड तालुक्यात आदिवासी आणि

केडीएमसीच्या स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या स्टेशन परिसर विकास प्रकल्पांतर्गत महात्मा फुले चौक ते सुभाष चौक हा रस्ता 24 ते 30 मीटर रुंदीकरण करण्याचे नियोजीत आहे. मात्र त्याविरोधात शेकडो नागरीकांनी हरकती घेतल्या असून केडीएमसीच्या या निर्णयावर आंबेडकरी अनुयायांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.

लक्ष्मीबाई मारुती ससाणे यांनी 1974 च्या काळात मुरबाड तालुक्यात आदिवासी आणि दलित बांधवांना पिण्याचे पाणी मिळावे म्हणून मोठा लढा उभारत न्याय मिळवून दिला होता. या लक्ष्मीबाईना कल्याणातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाविषयी माहिती मिळताच ते वाचवण्यासाठी त्यांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. तर आधी हरकती आणि आता या लढवय्या आजीबाईंनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठींबा वाढत असल्याचे दिसत आहे.

मागील लेखकल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 19 रुग्ण तर 24 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज
पुढील लेखकल्याण डोंबिवली महापालिकेच्या 21 नोव्हेंबर 2021 रोजीच्या लसीकरण केंद्रांची माहिती

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा