Home क्राइम वॉच पीडब्ल्यूडीच्या कल्याणातील शाखा अभियंत्याला 1 लाखांची लाच घेताना पकडले

पीडब्ल्यूडीच्या कल्याणातील शाखा अभियंत्याला 1 लाखांची लाच घेताना पकडले

कल्याण दि.13 सप्टेंबर :
कल्याणच्या तहसिलदारांना 1 लाखांची लाच घेताना पकडल्याचे प्रकरण ताजे असतानाच आज पीडब्ल्यूडी (सार्वजनिक बांधकाम विभाग) च्या शाखा अभियंत्याला 1 लाखांची लाच घेताना अँटी करप्शनने रंगेहात पकडले. तर याप्रकरणी या अभियंत्याने पूर्वीच 4 लाख रुपये घेतल्याची माहितीही ठाणे अँटी करप्शनकडून देण्यात आली.

अविनाश पांडुरंग भानुशाली असे या शाखा अभियंत्याचे नाव असून अवघ्या काही महिन्यांनी तो निवृत्त होणार होता. मुंबई वडोदरा हायवेच्या भूसंपादनात तक्रारदाराचे घर जात असून त्या बांधकामाचे मूल्यमापन करून अहवाल देण्यासाठी भानुशाली याने 1 लाखांची लाच मागितली होती. हे 1 लाख रुपये स्विकारताना ठाणे अँटी करप्शनने युनीटने पीडब्ल्यूडीच्या मुरबाड रोड येथील कार्यालयात सापळा रचून पकडण्यात आले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा