Home कोरोना शिवसेना आणि आई फाउंडेशनच्या माध्यमातून गरजू कुटुंबांना मदतीचा हात

शिवसेना आणि आई फाउंडेशनच्या माध्यमातून गरजू कुटुंबांना मदतीचा हात

 

कल्याण दि.8 जून :
कोरोना आणि लॉकडाऊन काळात रोजगार गेल्याने अनेकांवर कठीण परिस्थिती ओढावली आहे. अशा गरजू कुटुंब, व्यक्तींना शिवसेना आणि आई फाउंडेशनच्या माध्यमातून मदतीचा हात देण्यात आला. काही जणांना आर्थिक मदत तर काही कुटुंबांना अत्यावश्यक वस्तूंच्या किटचे यावेळी वाटप करण्यात आले.

शिवसेना उपशहर संघटक दिलीप दाखिनकर आणि आई फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने हा सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहे. आतापर्यंत 800 हून अधिक गरजू कुटुंबांना या उपक्रमाद्वारे मदत करण्यात आल्याची माहिती दिलीप दाखिनकर यांनी दिली.
यावेळी माजी नगरसेवक महेश गायकवाड, उपशहरप्रमुख हर्षवर्धन पालांडे, माजी सरपंच राहुल पाटील, विभागप्रमुख रामदास ढोणे, सुभाष ढोणे, सदाशिव पाटील, रवींद्र उतेकर, गणेश पवार, रवींद्र खांदोडे, सचिन पवार, उदय शिंदे आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा