Home राजकीय घडामोडी डोंबिवलीत एक रुपयात एक लिटर पेट्रोल; पेट्रोल भरण्यासाठी भलीमोठी रांग

डोंबिवलीत एक रुपयात एक लिटर पेट्रोल; पेट्रोल भरण्यासाठी भलीमोठी रांग

 

स्वस्त पेट्रोल उपक्रमाच्या माध्यमातून भाजपला चपराक

डोंबिवली, दि.14 : 
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त डोंबिवली युवा सेनेतर्फे उस्मा पेट्रोलपंप येथे 1 रुपयात 1 लिटर पेट्रोल असा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी पेट्रोल भरण्यासाठी तरुणांची मोठी झुंबड उडाली होती. शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, दीपेश म्हात्रे, प्रकाश म्हात्रे,योगेश म्हात्रे, पूजा म्हात्रे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

सध्या पेट्रोलच्या 1लिटरसाठी 102 रुपये मोजावे लागत आहेत. आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त 1 रुपये दराने 1 लिटर पेट्रोल देऊन शिवसेना युवासेना पदाधिकाऱ्यांनी एकप्रकारे केंद्र सरकारवर आसूड ओढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान पेट्रोल-डिझेल दरवाढी विरोधात शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला असून वारंवार शिवसेनेकडून आंदोलन सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून योगेश म्हात्रे यांनी ही अजब शक्कल लढवल्याचे दिसून आले. 1 रुपया दराने मिळणारे पेट्रोल भरण्यासाठी सुमारे 500 ते 600 तरुणांनी सकाळपासून रांग लावली होती.

मागील लेखमानवी वस्तीत शिरलेल्या 6 फुटी अजगराची वॉर रेस्क्यूकडून सुटका
पुढील लेखकचराच उचलला न गेल्याने मच्छी मार्केटमध्ये पसरल्या आळ्या ; व्यावसायिक आणि ग्राहकांचे आरोग्य धोक्यात

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा