Home ठळक बातम्या गोल्डन बेबी लीग फुटबॉल स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

गोल्डन बेबी लीग फुटबॉल स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

 

कल्याण दि.१० फेब्रुवारी :
एलिट स्पोर्टिंग अकादमीतर्फे कल्याण डोंबिवलीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या गोल्डन बेबी लीग फुटबॉल स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. ठाणे फुटबॉल संघटनेच्या सहकार्याने आयोजित या स्पर्धेमध्ये कल्याण डोंबिवली परिसरातील तब्बल ३०० चिमुकले फुटबॉलपटू सहभागी झाले आहेत.

कल्याण डोंबिवलीसारख्या शहरांमधील मुलांमध्ये असणारी फुटबॉलची आवड केवळ जोपासलीच जाऊ नये तर त्यांच्यातूनच उद्याचे नव्या दमाचे आणि नव्या पिढीचे खेळाडू तयार व्हावे या उद्देशाने गोल्डन बेबी फुटबॉल स्पर्धा आयोजित केली जात आहे. जागतिक फुटबॉल संघटना अर्थातच फिफाच्या (FIFA) विकास कार्यक्रमाअंतर्गत २०१८ पासून कल्याण डोंबिवलीमध्ये ही स्पर्धा भरवली जात असल्याची माहिती एलिट स्पोर्ट्स अकदामीने दिली.

लहान मुलांमधील ६ ते १२ हे वय कोणताही खेळ शिकण्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे समजले जाते. त्याच उद्देशाने ८ , १० आणि १२ अशा तीन वेगवेगळ्या वयोगटाच्या मुला मुलींसाठी दरवर्षी ही स्पर्धा घेतली जात आहे. यंदाच्या स्पर्धेमध्ये कल्याण आणि डोंबिवली परिसरातील ३०० हून अधिक खेळाडू सहभागी झाले असल्याची माहिती एलिटतर्फे देण्यात आली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा