Home ठळक बातम्या कल्याणच्या वैद्यकीय सेवेत मैलाचा दगड; दुर्मिळ अशी जुळ्या गर्भपाताची यशस्वी प्रक्रीया

कल्याणच्या वैद्यकीय सेवेत मैलाचा दगड; दुर्मिळ अशी जुळ्या गर्भपाताची यशस्वी प्रक्रीया

 

कल्याण दि.9 ऑगस्ट :
कल्याणात काही दिवसांपूर्वी झालेली गर्भपाताची अत्यंत किचकट आणि अवघड प्रक्रिया ही कल्याणच्या वैद्यकीय सेवेत मैलाचा दगड (milestone) ठरणार आहे. कल्याण पश्चिमेच्या मोरया हॉस्पिटलच्या प्रमूख स्त्रीरोग डॉ. शीतल गवांदे आणि त्यांच्या टीमने ही दुर्मिळ अशी जुळी गर्भपाताची (Twins Scar Ectopic Pregnancy) प्रक्रिया यशस्वीपणे करून दाखवली आहे.

मोरया रुग्णालयात काही दिवसांपूर्वी 29 वर्षीय गर्भवती महिला उपचारासाठी आली होती. सोनोग्राफी तपासणीत संबंधित महिला ही जुळी परंतु दुर्मिळ स्कार एकटोपिक (Twins Scar Ectopic Pregnancy) प्रेग्नंट असल्याचे आढळून आले. या अत्यंत दुर्मिळ प्रकारात गर्भपिशवीमध्ये गर्भ न राहता यापूर्वी झालेल्या सिझरिंगच्या जखमेवर/ टाक्यांवर हे गर्भ रुतून बसतात. त्याला वैद्यकीय भाषेत एकटोपिक (Twins Scar Ectopic Pregnancy) प्रेग्नंसी असे संबोधले जात असल्याची माहिती डॉ. शीतल गवांदे यांनी दिली. या प्रकारात गर्भपात करणे हे संबंधित रुग्णाच्या दृष्टीने अत्यंत अवघड असते. कधी कधी अशा प्रकारचे गर्भपात करताना मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन रुग्णाचा जीव धोक्यात येऊ शकतो.

 

मुंबईसारख्या ठिकाणी अशा प्रकारची शस्त्रक्रिया काही नविन नाही. मात्र कल्याणात अशा प्रकारच्या रुग्णावर यशस्वीपणे उपचार करणे ही कल्याणातील वैद्यकीय सेवेच्या दृष्टीने मोठे आव्हानात्मक होते.
वैद्यकीय क्षेत्रात सुमारे 15 ते 20 लाख रुग्णांमध्ये एखादा असा एकटोपिक (Twins Scar Ectopic Pregnancy) प्रेग्नंसीचा रुग्ण आढळून येतो. मात्र त्यानंतरही डॉ. शीतल गवांदे, डॉ. शैलेंद्र जाधव, डॉ. जितेंद्र बोबडे, डॉ. शाहीस्ता खान, डॉ. मधुरा मोहनालकर आणि संपूर्ण टीमने अत्यंत कौशल्याने ही किचकट वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण केली. आणि त्यासोबतच कल्याणातील वैद्यकीय सेवेच्या क्षेत्रात मोठी झेप घेतली.

अशा प्रकारच्या किचकट आणि आव्हानात्मक शस्त्रक्रिया करण्यासाठी कल्याण आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांसमोर यापूर्वी मुंबईशिवाय कोणताच पर्याय नसायचा. मात्र मोरया हॉस्पिटलच्या डॉ. शीतल गवांदे यांनी केलेल्या या शस्त्रक्रियेनंतर आता कल्याणात आणि तोही माफक दरांत हा पर्याय उपलब्ध झाला आहे. ज्यामुळे लोकांच्या वेळेसोबत पैशांचीही बचत होणार आहे.

मागील लेखदिव्यांगांसह निराधार महिलांचे मोफत लसीकरण; आमदार गणपत गायकवाड यांचा पुढाकार
पुढील लेखकेडीएमसी क्षेत्रात उद्या (10 ऑगस्ट) 2 ठिकाणी लसीकरण; कोव्हीशिल्डचा केवळ 2 रा डोस मिळणार

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा