Home ठळक बातम्या कल्याणात रिक्षावर झाड कोसळले; सुदैवाने कोणाला दुखापत नाही

कल्याणात रिक्षावर झाड कोसळले; सुदैवाने कोणाला दुखापत नाही

 

कल्याण दि. १२ ऑगस्ट :
कल्याण पश्चिमेला एका रिक्षावर भले मोठे झाड कोसळून रिक्षाचे मोठे नुकसान झाले. मात्र सुदैवाने या रिक्षाचा चालक गाडीत नसल्याने त्याचा जीव वाचला. कल्याण पश्चिमेच्या मोहिंदर सिंग शाळेबाहेरील रस्त्यावर हा प्रकार घडला.

गेल्या २-३ दिवसांपासून कल्याण डोंबिवलीत मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे काही ठिकाणी झाड उन्मळून पडण्याच्या घटना घडत आहेत. कल्याण पश्चिमेच्या मोहिंदर सिंग रोडवर अशाच एका घटनेत रिक्षाचे मोठे नुकसान झाले. तर या रिक्षाचा चालक काही कामानिमित्त रिक्षातून बाहेर उतरल्यामुळे त्याला कोणतीही दुखापत झाली नाही. परंतू या घटनेमध्ये रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे.

मागील लेखकल्याणातील तिरंगा रॅली : हजारो विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद
पुढील लेखस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित कल्याण डोंबिवली झाले तिरंगामय

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा