Home ठळक बातम्या कल्याण ग्रामीण भागात सुरू झाला अनोखा फिरता दवाखाना उपक्रम

कल्याण ग्रामीण भागात सुरू झाला अनोखा फिरता दवाखाना उपक्रम

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत झाले लोकार्पण

कल्याण दि.13 जून: 
युवासेनाप्रमुख तसेच पर्यावरण पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने कल्याण लोकसभा मतदारसंघातील नेवाळी नाका येथे ‘धर्मवीर आनंद दिघे फिरता दवाखाना’ उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यामध्ये डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन, वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्ष आणि वन रुपी क्लिनिकच्या माध्यमातून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.

या फिरत्या दवाखान्यामध्ये रुग्णांच्या तपासणीकरिता डॉक्टर आणि परिचारिका असणार असून तपासणीनंतर लागणारी औषधेही याठिकाणी उपलब्ध असणार आहेत. याव्यतिरिक्त अत्यावश्यक सेवेसाठी लागणारी ऑक्सिजन मशीनसह इमर्जन्सीवेळी लागणाऱ्या औषधांचा समावेश आहे. कोरोना  काळातील निर्बंधांमुळे ग्रामीण भागातील काही ज्येष्ठ नागरिक, विकलांग व्यक्ती, गर्भवती महिला यांच्यासह इतर नागरिकांना घराबाहेर पडण्यासाठी अडथळे निर्माण होत असतात. याचे गांभीर्य लक्षात घेऊन आपल्या मतदार संघातील नागरिकांना औषधोपचारांसाठी त्रास सहन करावा लागून नये यासाठी हा उपक्रम राबवल्याची माहिती खा.डॉ. शिंदे यांनी दिली.

यावेळी नेवाळीचे माजी सरपंच चैनु जाधव, तालुकाप्रमुख अशोक म्हात्रे, कल्याण पूर्व विधानसभा सहसंपर्क विजय जोशी, माजी नगरसेवक महेश गायकवाड, श्रीमलंगगड विभागप्रमुख संदीप पाटील, प्रभाकर पाटील, अर्जुन पाटील आणि शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा