Home ठळक बातम्या कल्याण मलंगगड मार्गावरील आडीवलीमध्ये रस्त्यावर साचलेल्या पाण्यात नागरिकांचे आंदोलन

कल्याण मलंगगड मार्गावरील आडीवलीमध्ये रस्त्यावर साचलेल्या पाण्यात नागरिकांचे आंदोलन

 

कल्याण दि.21 जुलै :
कल्याण डोंबिवलीमध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावली असून कल्याण मलंग रोडवरील आडवली गावातील नागरिकांनी प्रशासनाविरोधात अनोख्या पध्दतीने आंदोलन केले. रस्त्यावर साचलेल्या गुडघाभर पाण्यात ठिय्या मांडत प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध केला.

कल्याण ग्रामीणमधील आडीवली गावात पाण्याचा निचरा होण्यासाठी नालाच नाहीये, तर रस्त्यांचीही दुरुस्ती होत नसून दरवर्षी पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्येबाबत तक्रारी करूनही प्रशासन त्याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात आला. तसेच संतापलेल्या नागरिकांसह स्थानिक लोकप्रतिनिधी कुणाल पाटील यांनी रस्त्यावर साचलेल्या पाण्यात बसून ठिय्या आंदोलन केले. यावेळी महापालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत पालिकेचा निषेध करण्यात आला. तर 27 गावांतील समस्यांबाबत वारंवार पाठपुरावा करूनही पालिका प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असून येत्या आठवडाभरात 27 गावांतील रस्त्यासह नाल्याची कामे सुरू न केल्यास 27 गावांना जोडणारे सर्व रस्ते बंद करत रास्तारोको करण्याचा इशारा कुणाल पाटील यांनी यावेळी दिला.

मागील लेखकल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 106 रुग्ण तर 83 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज
पुढील लेखकल्याण डोंबिवलीत उद्याही (22 जुलै) महापालिकेचे लसीकरण नाहीच

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा