Site icon LNN

“श्वासात राजे अन ध्यासात राजे” : कल्याणच्या साहसवीराची छत्रपती शिवरायांना 16 हजार फुट उंचीवर अनोखी मानवंदना

Oplus_131072

रशिया दि.19 फेब्रुवारी :

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त कल्याणातील साहसवीर अजित कारभारी यांनी तब्बल 16 हजार 732 फूट उंचीवर अनोखी मानवंदना दिली. त्यांनी रशियातील कोलोम्ना या अतिथंड प्रदेशात L-410 विमानातून त्यांनी 16 हजार फुट उंचीवर स्काय डायव्हिंग करत छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेला ध्वज फडकवला. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना आणि त्यांच्या शौर्याला अनोखी मानवंदना दिली. महाराजांना अशाप्रकारे मानवंदना देणारे कल्याणातील साहसवीर अजित कारभारी हे पहिले भारतीय नागरिक ठरले आहेत.

 

पाहा व्हिडिओ 👇👇👇👇

व्हिडिओ माहिती सौजन्य : उमाकांत चौधरी, एल एन एन सिटीजन रिपोर्टर

 

Exit mobile version