Home राजकीय घडामोडी शिवसेना गोग्रासवाडी विभागातर्फे प्रभाग क्रमांक 83 मध्ये आधार कार्ड, सुकन्या समृद्धी योजना...

शिवसेना गोग्रासवाडी विभागातर्फे प्रभाग क्रमांक 83 मध्ये आधार कार्ड, सुकन्या समृद्धी योजना शिबीर

डोंबिवली दि.28 जानेवारी :

शिवसेना गोग्रासवाडी विभाग क्र. 3, प्रभाग क्र. 83 तर्फे आधार कार्ड आणि सुकन्या समृद्धी योजना शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचे आयोजन विभागप्रमुख अमोल पंढरीनाथ पाटील यांनी केले आहे. नाशिक जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, डोंबिवली विधानसभा संघटक तात्यासाहेब माने आणि कल्याण डोंबिवली महिला महानगर संघटक वैशाली दरेकर राणे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. पुढील 3 दिवस चालणाऱ्या या शिबिराचा लाभ घेण्यासाठी स्थानिकांची गर्दी होत आहे. शुक्रवारपर्यंत चालणाऱ्या या शिबीराच्या उद्घाटन कार्यक्रमाला विभागातील अनेक पदाधिकारीही उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा