Site icon LNN

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तपदी अभिनव गोयल

आठवड्याभरानंतर मिळाले कल्याण डोंबिवलीला नवे आयुक्त

कल्याण डोंबिवली दि.8 एप्रिल :
अखेर आठवड्याभराच्या कालावधीनंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला नवे आयुक्त मिळाले आहेत हिंगोली चे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांची कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे राज्य शासनाने त्या संदर्भात एक पत्र काढून या बदलीची माहिती दिली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त डॉक्टर इंदूराणी जाखड यांची 1 एप्रिल रोजी पालघर जिल्हाधिकारी पदी बदली झाल्याने हे पद आठवडाभर रिक्त होते.

अभिनव गोयल हे 2015 च्या बॅचचे आयएएस अधिकारी असून ते मूळचे मेरठ येथील आहेत. यांचे आई-वडील हे डॉक्टर असून आजोबा हे भौतिक शास्त्राचे तर आजी रसायनशास्त्राच्या प्राध्यापिका राहिल्या आहेत. आपल्या तिसऱ्या प्रयत्नात आयएएस परीक्षा 36व्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेले गोयल यांनी कानपूर आयआयटी मधून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे.

2018 ला नांदेड येथे सहाय्यक जिल्हाधिकारी त्यानंतर लातूर जिल्हा परिषदेचे सीईओ मग धुळ्याचे जिल्हाधिकारी आणि सध्या ते हिंगोलीच्या जिल्हाधिकारी पदी कार्यरत होते. या ठिकाणी त्यांनी आपल्या चांगल्या कामाची छाप सोडली असून कल्याण डोंबिवली कल्याण डोंबिवली महापालिकेतही ते असेच कार्यरत राहतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे

Exit mobile version