फायर NOC साठी पैसे घेतल्याची प्राथमिक माहिती
कल्याण दि.30 एप्रिल :
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) एका लिपिकाला 40 हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. (ACB Nabs Kalyan-Dombivli Municipal Corporation Clerk Red-Handed Accepting ₹40,000 Bribe)
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार अग्निशमन विभागाच्या ना हरकत दाखल्यासाठी (NOC) त्याने शाळा व्यवस्थापनाकडे तब्बल ४० हजार रुपयांची लाच मागितली होती. संबंधित शाळा प्रशासनाने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केल्यानंतर आज हे पैसे घेताना त्याला रंगेहात पकडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. भरत पाटोळे असे या लिपिकाचे नाव असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
दरम्यान ही सर्व प्राथमिक माहिती असून अँटी करप्शन विभागाकडून याबाबत प्रेस नोट प्रसिद्ध झाल्यावर याविषयी अधिकृत माहिती समोर येणार आहे..
अँटी करप्शन विभागाच्या या कारवाईमुळे केडीएमसीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
सविस्तर माहिती लवकरच…

