Home ठळक बातम्या कल्याण-शिळ मार्गावर जाहिरातीचे भलेमोठे होर्डिंग टेम्पोवर कोसळले; 2 जण जखमी

कल्याण-शिळ मार्गावर जाहिरातीचे भलेमोठे होर्डिंग टेम्पोवर कोसळले; 2 जण जखमी

 

डोंबिवली दि.17 मे :
कल्याण-शिळ मार्गावर देसाई गावाजवळ रस्त्याच्या मधोमध उभारण्यात आलेले जाहिरातीचे भलेमोठे होर्डिंग कोसळून 2 जण गंभीर जखमी झाले. आज सकाळपासून कल्याण डोंबिवलीत झालेल्या वादळी वाऱ्यामुळे हे होर्डिंग्ज कोसळल्याने काही काळ वाहतूकही ठप्प झाली होती. मात्र महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत हे महाकाय होर्डींगही बाजूला केले आणि जखमींनाही त्याखालून बाहेर काढले.(cyclone effect Advertising hoardings on the Kalyan-Shil road collapsed at a tempo; 2 injured)

सध्या कल्याण – शिळ मार्गाच्या सहा पदारीकरणाचे काम सुरू असून जागोजागी त्याच्या मधोमध अनेक मोठी जाहिरातीची होर्डींग उभारण्यात आली आहेत. त्यापैकी एक होर्डींग आज दुपारी एका टेम्पोच्या ड्रायव्हिंग केबिनवर पडले आणि त्यात चालकासह आणखी एक जण त्याखाली अडकून पडले. दरम्यान याच परिसरात पडलेले झाड बाजूला करण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिका अग्निशमन दलाचे पथक कार्यरत होते. त्यांना काही जणांनी येऊन या अपघाताची माहिती दिली. त्यावर ताबडतोब अग्निशमन दलाचे हे पथक होर्डींग पडलेल्या ठिकाणी पोहचले आणि कटरच्या सहाय्याने टेम्पोत अडकलेल्या दोघांना बाहेर काढले. तर नंतर जेसीबीच्या सहाय्याने हे होर्डींग त्यांनी बाजूला करत ठप्प झालेली वाहतूक सुरू केली. तसेच या दुर्घटनेतील जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. हे बचावकार्य नंदकुमार शेंडकर, कुणाल वाटाडे, आकाश जमावे आदींच्या पथकाने पार पाडले.
दरम्यान या दुर्घटनेनंतर या मार्गावर नव्याने उभारण्यात आलेल्या आणि आधीपासूनच अस्तित्वात असणाऱ्या होर्डींगच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा