Home ठळक बातम्या कल्याण डोंबिवलीत राहूल गांधींविरोधात जोडे मारो आंदोलन

कल्याण डोंबिवलीत राहूल गांधींविरोधात जोडे मारो आंदोलन

कल्याण डोंबिवली दि. 17 नोव्हेंबर :

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या विधानाचे कल्याण डोंबिवलीमध्ये तीव्र पडसाद उमटलेले पाहायला मिळाले. बाळासाहेबांची शिवसेना पक्षातर्फे राहूल गांधी यांच्या फोटोला जोडे मारत निषेध करण्यात आला.

महाराष्ट्रात सध्या राहूल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरू आहे. त्या यात्रेदरम्यान झालेल्या एका सभेमध्ये बोलताना राहूल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबाबत विधान केले आहे. ज्याचे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटताना दिसत आहे. भाजप नेते आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक भाजपं नेत्यानी त्याचा निषेध केला असतानाच आज बाळासाहेबांच्या शिवसेनाही आक्रमक झालेली दिसत आहे.

बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षातर्फे कल्याण आणि डोंबिवलीत आज सकाळी जोडे मारो आंदोलन करण्यात आले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही यावेळी करण्यात आली. कल्याण डोंबिवलीतील या आंदोलनामध्ये बाळा साहेबांची शिवसेना पक्षाचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा