Home ठळक बातम्या राम मंदिरासाठी कल्याणातून 35 कोटी निधी संकलनाचे उद्दिष्ट; 17 लाख कुटुंबांशी साधणार...

राम मंदिरासाठी कल्याणातून 35 कोटी निधी संकलनाचे उद्दिष्ट; 17 लाख कुटुंबांशी साधणार संवाद

 

कल्याण दि.13 जानेवारी :
सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निकालामुळे राम मंदिर उभारणीचा मार्ग प्रशस्त झाल्यानंतर महाराष्ट्रात ठिक ठिकाणी निधी संकलन केले जाणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून कल्याणातही तब्बल 17 लाख कुटुंबांशी संवाद साधून 35 कोटी रुपयांच्या निधीसंकलनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. विश्व हिंदू परिषद कल्याण जिल्ह्यातर्फे नमस्कार मंडळ सभागृहात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.
15 जानेवारीपासून या उपक्रमाला प्रारंभ होणार असून 27 फेब्रुवारीपर्यंत हे निधी संकलन चालणार आहे. या निधी संकलनासाठी 10 रुपये, 100 रुपये आणि 1 हजार रुपयांची कुपन वितरित केली जाणार आहेत. तर 1 हजारापेक्षा जास्त रक्कम असल्यास त्यासाठी पावती दिली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या अभियानाला कल्याण जिल्ह्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देण्याचे आवाहन यावेळी विश्व हिंदू परिषदेतर्फे करण्यात आले.
यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेला कल्याण विभाग मंत्री मनोज रायचा, कल्याण जिल्हा मंत्री अभिषेक गोडबोले, अभियान प्रमुख रोशन जगताप, मातृशक्ती प्रमुख ऍड. सुधा जोशी उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा