Home ठळक बातम्या कल्याण डोंबिवलीतील हवेची गुणवत्ता घसरली ; कल्याणचा एक्यूआय 275 तर डोंबिवलीचा 235...

कल्याण डोंबिवलीतील हवेची गुणवत्ता घसरली ; कल्याणचा एक्यूआय 275 तर डोंबिवलीचा 235 वर

सर्दी, खोकला आणि घशाशी संबंधित आजार बळावण्याची भिती

कल्याण – डोंबिवली दि. 20 जानेवारी :
कल्याण डोंबिवलीमध्ये गुलाबी थंडीने आपले चांगलेच बस्तान बसवले आहे. मात्र त्याच पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीतील हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात घसरल्याचे हवा गुणवत्ता निर्देशांकावरून (air quality index-AQI) दिसून येत आहे. कल्याण शहराचा हवा गुणवत्ता निर्देशांक (air quality index-AQI) तब्बल 275 (वाईट पातळी) तर डोंबिवलीचा हवा गुणवत्ता निर्देशांक (air quality index-AQI) 235 इतका नोंदवला गेला आहे. परिणामी सर्दी, खोकल्यासह घशाशी संबंधित आजार वाढण्याची भिती वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ मंडळी व्यक्त करत आहेत. (Air quality in Kalyan Dombivli deteriorated; Kalyan’s AQI is 275 while Dombivli’s is 235)

मकरसंक्रांतीच्या काही दिवस अगोदरपासूनच कल्याण डोंबिवली शहरात चांगलीच थंडी पडत असल्याने नागरिकांमध्येही आनंदाचे वातावरण आहे. परंतू दुसरीकडे या दोन्ही शहरांतील हवा ही सध्या मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाल्याचे गुणवत्ता निर्देशांकावरून (air quality index-AQI) दिसून येत आहे. ज्यामधे पीएम 10, पी एम 2.5 (particulate matter PM10, PM 2.5) आणि नायट्रोजन ऑक्साईड (Nitrogen oxide NO2) या दोन प्रदूषणकारी घटकांमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसत आहे.

कल्याण आणि डोंबिवली या दोन ठिकाणी शासनाकडून हे हवा गुणवत्ता निर्देशांक (air quality index-AQI) फलक लावण्यात आहेत. कल्याणात खडकपाडा परिसरात तर डोंबिवलीमध्ये पिंपळेश्वर मंदिर परिसरामध्ये हे हवा गुणवत्ता निर्देशांक फलक (air quality index-AQI) लावण्यात आले असून त्याद्वारे दररोज शहरातील हवा गुणवत्तेची माहिती प्रसारित केली जात आहे. आपण राहत असणाऱ्या शहरातील हवा कितपत शुद्ध आहे किंवा किती प्रदूषित आहे याचा अंदाज या हवा गुणवत्ता निर्देशांकावरून (air quality index-AQI) लावण्यास मोठी मदत होते.

त्यानूसार कल्याण आणि डोंबिवली या दोन्ही ठिकाणी हवा गुणवत्ता निर्देशांकाने 200 ची पातळी ओलांडली आहे. कल्याण शहरात तब्बल 275 तर डोंबिवली परिसरात 235 पर्यंत इतका हवा गुणवत्ता निर्देशांक (air quality index-AQI) खाली आला आहे. कल्याणातील हवेमध्ये पीएम 2.5 आणि पी एम 10 या प्रदूषणकारी घटकांमध्ये वाढ झाल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून दिसून येत आहे. तर डोंबिवलीत पीएम 10 आणि एनओ 2 या प्रदूषणकारी घटकांमध्ये वाढ झाल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून दिसून येत आहे.

सर्दी खोकलासह श्वसन आजार बळवण्याची शक्यता…

दरम्यान वातावरणातील हवेची गुणवत्ता घसरल्याचा विपरीत परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होण्याची भिती वैद्यकीय तज्ञ व्यक्त करीत आहेत. हवा प्रदूषित झाल्यामुळे नागरिकांना सर्दी, खोकला आणि घशाशी संबंधित आजार बळावण्याची भिती आहे. तर प्रदूषणामुळे होणारे सर्दी खोकला किंवा घशाशी संबंधित आजार बरे हे ऐरव्हीच्या सर्दी – खोकल्यापेक्षा अधिक काळ त्रास देतात. आपण सतत प्रदूषणाच्या संपर्कात असल्याने ते बरे होण्यासाठी अधिक विलंब लागत असल्याची प्रतिक्रिया ईएनटी तज्ञ डॉ. अतूल पाटील यांनी एलएनएनशी बोलताना दिली. तर या प्रदूषणाचा सर्वाधिक त्रास हा दमा – अस्थमा आजाराच्या रुग्णांवर अधिक जाणवत असल्याने नागरिकांनी त्यादृष्टीने काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा