Home ठळक बातम्या लाभार्थ्यांना बीएसयुपी घरांचे वाटप करा; डोंबिवली शिवसेना शहरप्रमुखांचा उपोषणाचा इशारा

लाभार्थ्यांना बीएसयुपी घरांचे वाटप करा; डोंबिवली शिवसेना शहरप्रमुखांचा उपोषणाचा इशारा

 

डोंबिवली, दि.11 नोव्हेंबर :
केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी योजनेतील जेएनएनयूआरएम (बीएसयूपी) प्रकल्पानुसार शहर झोपडपट्टी मुक्त योजना अमंलात आणण्यात आली.कल्याण –डोंबिवली महानगरपालिका हद्दीत हि योजना राबविताना लाभार्थ्यांना अद्याप घरे मिळाली नाहीत. लाभार्थ्यांना घरांचा ताबा मिळत नसल्याने यात नक्की कोण दिरंगाई करत असून घरे तयार असतानाही लाभार्थी घरापासून का वंचित राहिले? असा प्रश्न शिवसेनेने उपस्थित केला आहे. शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे यांनी पालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांना पत्र देऊन बीएसयुपी प्रकल्पातील घरांचा ताबा मिळेपर्यत प्रशासनाविरोधात दत्तनगर चौकात 15 नोव्हेंबरपासून 3 दिवस लाक्षणिक उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे.

जेएनएनयूआरएम (बीएसयूपी) प्रकल्प सुरु होऊन 11 ते 12 वर्ष उलटली असून दत्तनगर येथील सुमारे 250 लाभार्थी या प्रकल्पातील घरापासून वंचित आहेत. सुरुवातीला ठेकेदाराने लाभार्थ्यांना घरभाडे दिले.त्यानंतर काही महिन्यानंतर ठेकेदाराने घरभाडे देणे बंद केल्याचा आरोप लाभार्थ्यांनी केला आहे. एकीकडे राहते घर राहिले नाही आणि दुसरीकडे महापालिकेत वारंवार फेऱ्या मारूनही लाभार्थ्यांना योग्य न्याय मिळाला नाही. प्रकल्पातील घरे तयार असूनही अद्याप ताबा मिळत नसल्याचे शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे यांनी सांगितले.

दरम्यान लाभार्थ्यांना लवकरात लवकर घरे मिळण्याच्या मागणीसाठी डोंबिवलीतील तिरंगा झेंडा संकल्पतीर्थ दत्तनगर चौक येथे आपण 3 दिवसांच्या लाक्षणिक उपोषणाला बसणार असल्याचे राजेश मोरे यांनी केडीएमसी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.तसेच लक्षणिक उपोषण करूनही लाभार्थ्यांना घरे न मिळाल्यास शेवटी आमरण उपोषण करणार असल्याचेही मोरे यांनी सांगितले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा