Home ठळक बातम्या गुडन्यूज : हॉटेल-रेस्टॉरंटचीही वेळ वाढवली; कल्याणात पेढे वाटून साजरा केला आनंद

गुडन्यूज : हॉटेल-रेस्टॉरंटचीही वेळ वाढवली; कल्याणात पेढे वाटून साजरा केला आनंद

 

कल्याण दि.11 ऑगस्ट :
गेल्या काही दिवसांपासून निर्णयाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांना राज्य शासनाने अखेर गुड न्यूज दिली आहे. इतर दुकानांप्रमाणे आता हॉटेल – रेस्टॉरंटलाही रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. येत्या 15 ऑगस्टपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. हा निर्णय समजताच कल्याणातील हॉटेल व्यावसायिकांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला.

साधारणपणे एक आठवड्यापूर्वीं राज्य शासनाने राज्यातील निर्बंध शिथिल करत दुकानदारांसाठी असणारी वेळ वाढवून दिली. मात्र त्यामध्ये हॉटेल-व्यावसायिकांचा कोणताही विचार न झाल्याने राज्यातील हॉटेल असोसिएशनने निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली होती. तसेच वेळ वाढवून दिली नाही तर हॉटेल बंद करण्याचा इशाराही दिला होता. त्यानंतर हॉटेल व्यावसायिकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेत आपल्या व्यथाही मांडल्या होत्या.
दरम्यान आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हॉटेल रेस्टॉरंटच्या वेळा वाढवण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. आणि ही बातमी समजताच कल्याणात हॉटेल व्यावसायिकांनी एकच जल्लोष करत राज्य सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले. तसेच राज्य शासनाने दिलेल्या सर्व नियमांचे आमही काटेकोरपणे पालन करण्याचे आश्वासनही यावेळी हॉटेल व्यावसायिकांनी दिले आहे.

मागील लेखकल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 58 रुग्ण तर 59 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज
पुढील लेखमनसे वाहतूक सेनेतर्फे चिपळूणमधील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची मदत

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा