Home कोरोना अंथरुणाला खिळून असलेल्या दिव्यांगांचेही लसीकरण करा – दिव्यांग सामाजिक कार्यकर्त्याची मागणी

अंथरुणाला खिळून असलेल्या दिव्यांगांचेही लसीकरण करा – दिव्यांग सामाजिक कार्यकर्त्याची मागणी

 

कल्याण – डोंबिवली दि.31 ऑगस्ट :
अंथरुणाला खिळून असल्याने लस घेण्यासाठी घराबाहेर पडू शकत नसणाऱ्या दिव्यांग व्यक्तींच्या लसीकरणासाठी केडीएमसीने तातडीने उपाय योजना करण्याची मागणी डोंबिवलीतील दिव्यांग सामाजिक कार्यकर्ते दत्ता सांगळे यांनी केली आहे. दत्ता सांगळे यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर गेल्या दोन दिवसांपूर्वी दिव्यांग व्यक्तींना कोणत्याही टोकनशिवाय थेट लस देण्याची सुविधा केडीएमसीकडून उपलब्ध झाली आहे. मात्र अंथरुणाला खिळून असणाऱ्या आणि लसीकरण केंद्रांवर येऊ न शकणाऱ्या दिव्यांगांच्या लसीकरणाचे काय? असा प्रश्न सांगळे यांनी केडीएमसी प्रशासनाला विचारला आहे.

तर दिव्यांगांना कोणत्याही रांगेत उभे न करता आणि टोकनशिवाय थेट पद्धतीने लसीकरण करण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाच्या केडीएमसीला विसर पडला होता. दिव्यांग व्यक्तींबाबतच्या या निर्णयाची आपण केडीएमसी अधिकाऱ्यांना आठवण करून दिली आणि मग त्यानंतर हे दिव्यांगांच्या लसीकरणाला सुरुवात झाल्याचे सांगळे यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी डोंबिवलीतील केडीएमसीच्या एका लसीकरण केंद्रावर टोकन नव्हते म्हणून दिव्यांग आई आणि मुलाला लस घेता आली नाही. ही बाब आपल्याला समजल्यावर केडीएमसी अधिकाऱ्यांशी आपण बोललो आणि त्यांना सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची आठवण करून दिली. त्यानंतर मग सगळी सूत्रे फिरली आणि संबंधित दिव्यांग व्यक्तींचे लसीकरण करण्यात आल्याचे दत्ता सांगळे यांनी सांगितले.

तर फर्नाटलाईन वर्कर्सचे लसीकरण सुरू होणार होते त्यावेळी दिव्यांग व्यक्तींना प्राधान्य देण्याबाबत आपण मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह अनेक मंत्र्यांना ई मेलद्वारे मागणी केल्याचेही ते म्हणाले. तसेच लसीकरण केंद्रांवर जाऊ न शकणाऱ्या दिव्यांग व्यक्तींचे मुंबई-ठाण्याच्या धर्तीवर लसीकरण करण्याची मागणीही दत्ता सांगळे यांनी केडीएमसी प्रशासनाकडे केली आहे. त्यावर आता केडीएमसी प्रशासन काय निर्णय घेते हे लवकरच स्पष्ट होईल.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा