Home ठळक बातम्या कल्याणातील शाळांचा पालक म्हणून मदतीसाठी सदैव तयार – माजी आमदार नरेंद्र पवार

कल्याणातील शाळांचा पालक म्हणून मदतीसाठी सदैव तयार – माजी आमदार नरेंद्र पवार

गजानन विद्यालय सत्कार सोहळ्यात नरेंद्र पवारांचे प्रतिपादन

कल्याण दि.6 एप्रिल :
सज्जन आणि संस्कारित पिढी घडवत असलेल्या या संस्था आहेत, कल्याणमधील सर्व शाळांचा पालक म्हणून त्यांच्या मदतीसाठी सदैव मदतीसाठी तयार असल्याचे मत माजी आमदार तथा भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक नरेंद्र पवार यांनी व्यक्त केले. कल्याण पश्चिममधील श्री गजानन विद्यालय माध्यमिक शाळेत माजी आमदार नरेंद्र पवार यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. आमदार निधीतून संरक्षक भिंत आणि पाणपोईसाठी भरीव निधी दिल्यानिमित्त हा सत्कार करण्यात आला.

शैक्षणिक संस्था या समाज घडवण्यासाठी महत्वाच्या आहेत. समाजातील प्रत्येक चांगल्या घटकांची जबाबदारी ही शाळांची असते. या संस्था टिकाव्या, वाढीस लागाव्या आणि समृद्ध व्हाव्या अशी आपली अपेक्षा असते. आपण आमदार असताना तर शाळांसाठी निधी असो अथवा कोणते काम असो मनापासूनच केले. मात्र आमदार नसतानाही त्याच तत्परतेने कार्यरत असल्याचे पवार यांनी सांगितले.

यावेळी श्री गजानन विद्या प्रसारक मंडळ, कल्याण संस्थेच्या अध्यक्षा राष्ट्रपती पुस्कार विजेत्या प्रतिभा भालेराव, संस्थेचे संचालक केदार पोंक्षे, किशोर काळे, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका कांचन भालेराव, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका माळी मॅडम, भटके विमुक्त आघाडी प्रदेश युवा सरचिटणीस अशोक शेळके आदी पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा