Home ठळक बातम्या …आणि महाराष्ट्र नगर येथील नागरिकांची झाली चिखलातून सुटका

…आणि महाराष्ट्र नगर येथील नागरिकांची झाली चिखलातून सुटका

माजी नगरसेवकाने स्वखर्चाने केले खडीकरण

कल्याण दि.10 ऑगस्ट :
कल्याण पश्चिमेतील महाराष्ट्र नगर येथील नागरिकांची गेल्या 10 वर्षांपासूनची रस्त्याची समस्या अखेर संपुष्टात आली आहे. विशेष म्हणजे महापालिका प्रशासनाची वाट न पाहता माजी नगरसेवकाने स्वखर्चाने हा प्रश्न दूर केला.

कल्याण पश्चिमेतील माता रमाबाई आंबेडकर नगर आणि महाराष्ट्र नगर परिसरातील कच्चा रस्ता गेल्या 10 वर्षांपासून सुधारण्याची वाट पाहत होता. पावसाळ्यामध्ये तर या रस्त्यासोबतच इथे राहणाऱ्या नागरिकांचेही मोठे हाल व्हायचे. यासंदर्भात स्थानिकांनी अनेक वेळा केडीएमसी प्रशासनाकडे हा प्रश्न दूर करण्याची मागणी केली होती. अखेर भाजप पदाधिकारी प्रिया शर्मा आणि विशाल शेलार यांनी माजी नगरसेवक संदीप गायकर यांना ही समस्या सांगितली. त्यावर माजी नगरसेवक गायकर यांनी तातडीने पावले उचलत स्वखर्चाने या रस्त्याचे खडीकरण करून हा प्रश्न दूर केला.
इतक्या वर्षांपासूनचा असणारा हा प्रश्न सुटल्याने स्थानिकांनी माजी नगरसेवक संदीप गायकर यांचे आभार मानले आहेत.

मागील लेखमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर रविंद्र चव्हाण यांचे डोंबिवलीत जल्लोषात स्वागत
पुढील लेखबारावे घनकचरा प्रकल्पाविरोधात स्थानिक रहिवासी संतप्त तर कचऱ्याच्या गाड्या जाळण्याचा मनसेचा इशारा

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा