Home ठळक बातम्या उल्हासनगरमध्ये आणखी एक इमारत दुर्घटना: 5 मजली इमारतीचा स्लॅब कोसळून 7 जणांचा...

उल्हासनगरमध्ये आणखी एक इमारत दुर्घटना: 5 मजली इमारतीचा स्लॅब कोसळून 7 जणांचा मृत्यू

 

उल्हासनगर दि.29 मे :
उल्हासनगरमध्ये पुन्हा एकदा भीषण इमारत दुर्घटना झाली आहे. एका 5 मजली इमारतीचे स्लॅब थेट तळमजल्यावर कोसळून यामध्ये 7 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. शुक्रवारी रात्री 9 ते 9.30 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. उल्हासनगरच्या 2 नंबरमधील नेहरू चौकात बँक ऑफ बडोदासमोर ही साई सिद्धी नावाची इमारत आहे. घटनेची माहिती मिळताच ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही घटनास्थळी भेट देत बचाव आणि मदतकार्याची पाहणी केली. (Another building accident in Ulhasnagar: A slab of a 5 storey building collapsed, killing 7 people)

या घटनेची माहिती मिळताच उल्हासनगर अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून ठाणे महापालिकेची डिझास्टर रेस्क्यू फोर्सची टीमही घटनास्थळी दाखल झाली. या ठिकाणी शोधकार्य सुरू असून आत्तापर्यंत 7 जणांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. अजूनही काही जण ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे

दरम्यान १५ मे रोजीही उल्हासनगरमध्ये अशीच एक दुर्घटना घडली होती. उल्हासनगर शहरातील कॅम्प एक भागात असलेल्या मोहिनी पॅलेस या 4 मजली इमारतीच्या टेरेसचा स्लॅब कोसळून 5 जणांना जीव गमवावा लागला होता. त्याला अवघे काही दिवसही उलटत नाहीत तोच काल आणखी एक दुर्घटना घडल्याने इथल्या इमारतींच्या सुरक्षेचा आणि नागिरकांच्या जीवाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मागील लेखकल्याण डोंबिवलीत उद्या 19 ठिकाणी लसीकरण; 60 वर्षांवरील नागरिकांसाठी 4 केंद्र राखीव
पुढील लेखकल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 193 रुग्ण तर 192 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा