Home ठळक बातम्या केडीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या आणखी एका माजी नगरसेवकाचा शिवसेनेत प्रवेश

केडीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या आणखी एका माजी नगरसेवकाचा शिवसेनेत प्रवेश

ठाणे दि.9 फेब्रुवारी :
आगामी केडीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने भाजपला आणखी एक दे धक्का दिला आहे. नगरविकास मंत्री आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपचे माजी नगरसेवक विशाल पावशे यांनी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामूळे शिवसेनेत प्रवेश केलेल्या भाजप नगरसेवकांची संख्या आता 4 झाली आहे.

केडीएमसीची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजप या दोन्ही प्रमूख पक्षांनी एकमेकांविरोधात कंबर कसली असून शिवसेनेने त्यात आघाडी घेतल्याचे दिसत आहे. साधारणपणे दोन महिन्यांपूर्वी भाजपच्या तीन नगरसेवकानी शिवसेनेत प्रवेश केला होता. यातून भाजप सावरत असतानाच शिवसेनेने आणखी एका भाजप नगरसेवकाला आपल्याकडे खेचून घेतले आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यात आयोजित कार्यक्रमात पावशे यांनी शिवबंधन हाती बांधले आहे. तर येत्या काळात भाजपचे आणखी काही नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

कोण आहेत विशाल पावशे…?
विशाल पावशे हे भाजपचे नगरसेवक असले तरी 2010 च्या केडीएमसी निवडणुकीत ते राष्ट्रवादीच्या तिकिटावर पालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. यानंतर झालेल्या 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश करत विधानसभा निवडणूक लढवली. मात्र या निवडणुकीत त्यांना आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून हार पत्करावी लागली. तर 2015 च्या महापालिका निवडणुकीत पावशे भाजपाच्या तिकिटावर केडीएमसीमध्ये नगरसेवकपदी विराजमान झाले होते. मात्र त्यानंतर झालेल्या 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपविरोधात उघडपणे शिवसेना पुरस्कृत बंडखोर उमेदवार धनंजय बोडारे यांचा प्रचार केला होता.

तर आता शिवसेनेने दिलेल्या या धक्क्याला भाजप कशाप्रकारे प्रत्युत्तर देते हे येत्या काळात स्पष्ट होईल.

मागील लेखडोंबिवली पश्चिम, कल्याण पूर्व आणि उल्हासनगरच्या काही भागातील वीजपुरवठा शुक्रवारी राहणार बंद
पुढील लेखकल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 38 रुग्ण तर 816 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा