Site icon LNN

डोंबिवलीतील आणखी एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू – केडीएमसी प्रशासनाची माहिती

 

कल्याण डोंबिवली दि.4 जून :
कोविडमुळे डोंबिवलीतील आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.
या व्यक्तीचे वय 77 वर्ष इतके होते आणि 28 मे रोजी डोंबिवलीतील एका खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. 30 मे रोजी या व्यक्तीची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती ही वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपा शुक्ल यांनी एलएनएनशी बोलताना दिली. तसेच या व्यक्तीने कोविड लस घेतली होती आणि या व्यक्तीला कॅन्सर आजारही असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
दरम्यान या मृत्यूमुळे कल्याण डोंबिवलीतील कोविडमुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची संख्या आता तीन वर पोहोचली आहे.

Exit mobile version