Site icon LNN

डोंबिवलीच्या सांस्कृतिक वैभवात आणखीन एक मानाचा तुरा ; डोंबिवलीकर भजन भवनाचे थाटात लोकार्पण

भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून झालीय निर्मिती

डोंबिवली दि.13 ऑक्टोबर :
सांस्कृतिक नगरी अशी ओळख असलेल्या डोंबिवलीच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या डोंबिवली भजन भवनाचे आनंददायी सोहळ्याच्या माध्यमातून अतिशय थाटात लोकार्पण करण्यात आले. डोंबिवली पश्चिमेतील गणेश नगर विसर्जन घाट येथील वृंदावन कॉम्प्लेक्स परिसरात ही सुंदर वास्तू उभारण्यात आली आहे.(Another prestigious addition to the cultural splendor of Dombivli; Dombivalikar Bhajan Bhavan inaugurated in a grand manner)

भजन हा आपल्या महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा एक प्रमुख घटक असून आपल्या डोंबिवली शहरालाही भजनी मंडळांची मोठी परंपरा लाभली आहे. ही परंपरा जोपासणे हे आपले कर्तव्य आहे. आणि या कर्तव्यभावनेतून आपण हे ‘डोंबिवलीकर भजन भवन’ उभारल्याची भावना यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केली. तसेच या भवनाच्या माध्यमातून नवी पिढी निर्माण करण्यासह आपल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विचारांचा पाया असणारी आध्यात्मिक संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचण्यात हे भवन मोठी भूमिका बजावेल असा विश्वासही चव्हाण यांनी व्यक्त केला.

आमदार विकास निधीच्या माध्यमातून ही वास्तू उभारण्यात आली असून त्याच्या लोकार्पण सोहळ्यामध्ये डोंबिवली पश्चिम येथील युवा गायक राजयोग धुरी यांचा सत्कारही करण्यात आला.

यावेळी लोकरे बुवा, शहाबाजकर बुवा, प्रमोद धुरी बुवा, मुणगेकर‌ बुवा, चिले बुवा, भाई राणे बुवा, सतीश राणे बुवा यांच्यासह भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब, माजी जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी, भाजपा अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश महामंत्री शशिकांत कांबळे, माजी नगरसेवक राहुल दामले, माजी नगरसेवक जनार्दन म्हात्रे, माजी नगरसेवक नंदू म्हात्रे, ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील, राहुल म्हात्रे, नंदू जोशी, रेखाताई म्हात्रे तसेच मोठ्या संख्येने डोंबिवलीकर उपस्थित होते.

Exit mobile version