Home कोरोना विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी शाळेकडून आर्थिक मदतीचे आवाहन

विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी शाळेकडून आर्थिक मदतीचे आवाहन

कल्याण दि.28 ऑगस्ट :
कोरोनामुळे अनेक पालकांचे रोजगार गेल्याने परिणामी त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा विद्यार्थ्यांचे पुढील शिक्षण थांबू नये यासाठी कल्याणातील शाळेकडूनच आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.

कल्याणातील बालक मंदिर संस्था, इंग्लिश माध्यम, माध्यमिक शाळा म्हणजे इंदुताई देवधर यांनी 1949 साली लावलेलं लहानसे रोपटे. पुढे या रोपट्याचा मोठा वटवृक्ष झाला. बदलत्या काळाच्या गरजेनुसार संस्थेने इंग्लिश माध्यमाच्या शाळा सुरु केल्या. शाळा इंग्लिश माध्यमाच्या असल्या तरी शाळेत संस्कृती, संस्कार आणि मूल्यांची जपणूक मात्र केली जाते. उत्कृष्ट विद्यार्थी घडवणे हेच शाळेचे ध्येय असल्याने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेत विविध स्पर्धा, उपक्रम, बौद्धिक परीक्षा, घेतल्या जात असल्याची माहिती बालक मंदिर संस्थेकडून देण्यात आली.

मात्र गेल्या वर्षी आलेल्या कोरोना विषाणूच्या संकटामुळे शाळेतील अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांचा रोजगार बंद झाला असून त्यांच्या मुलांच्या पुढील शिक्षणाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हे विद्यार्थी हुशार असल्याने त्यांचे भविष्य घडवण्यासाठी शाळेतर्फे मदत केली जात असली तरी अद्यापही आणखी आर्थिक मदतीची आवश्यकता आहे.

त्यामुळे शाळेतील माजी विद्यार्थी, समाजातील दानशूर व्यक्ती, हितचिंतक आदींनी या विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये म्हणून पुढे येण्याचें आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क :- भाग्यश्री कुलकर्णी 90041 28040 / त्रिवेणी शिंपी 86527 39033.

मागील लेखधक्कादायक : डोंबिवली-ठाकुर्ली दरम्यान रेल्वे रुळांवर 15 छोटे दगड रचून ठेवल्याचा प्रकार
पुढील लेखब्रिजकीशोर दत्त यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदी निवड

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा