Home ठळक बातम्या ठाणे जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत 80.23 टक्के मतदान ; अंबरनाथमध्ये सर्वाधिक

ठाणे जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत 80.23 टक्के मतदान ; अंबरनाथमध्ये सर्वाधिक

ठाणे दि.15 जानेवारी :
ठाणे जिल्ह्यातील 143 ग्रामपंचायतीकरीता झालेल्या निवडणुकीत सुमारे 80.23 टक्के मतदान झाले असून सर्वाधिक मतदान अंबरनाथ तालुक्यात झाल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे.

ठाणे जिल्ह्यातील 143 ग्राम पंचायतीमध्ये आज मतदान घेण्यात आले. त्यात मुरबाडमध्ये 81.85 टक्के, अंबरनाथमध्ये 82.84 टक्के, भिवंडीमध्ये 82.78, कल्याणमध्ये 71.66 आणि शहापूरमध्ये 80.18 टक्के मतदान झाले आहे. यामध्ये एकूण 94 हजार 602 स्त्रिया, 1 लाख 6 हजार 208 पुरुष मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. तर याठिकाणी 1 लाख 18 हजार 250 महिला आणि इतर – 2 अशा 2 लाख 50 हजार 168 मतदार आहेत.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा