Site icon LNN

दिवाळीचा स्टॉल लावण्यावरून डोंबिवलीत बचत गटाच्या महिला आणि फेरीवाल्या महिलांमध्ये वाद

डोंबिवली दि.15 ऑक्टोबर :
दिवाळीचा स्टॉल लावण्यावरुन डोंबिवलीमध्ये महिला बचत गट आणि फेरीवाल्या महिलांमध्ये मोठा वाद झाला. हा वाद इतका वाढला की फेरीवाल्या महिलांनी स्वतःच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेत स्वतःला पेटवून घेण्याचाही प्रयत्न केला. डोंबिवली पश्चिमेच्या घनश्याम गुप्ते मार्गावर काल सायंकाळी हा प्रकार घडला.(argument-between-mahila-bachat-group-women-and-hawker-women-in-dombivli-over-setting-up-a-diwali-stall)

सध्या सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरू असून बाजारपेठाही दिवाळीच्या वस्तूंनी सजल्या आहेत. या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीतील गुप्ते रोडवर सोमवारी महिला बचत गटाकडून दिवाळीच्या पदार्थांचा स्टॉल लावण्यात येत होता. मात्र हा स्टॉल लावण्याला काही महिला फेरीवाल्यांनी विरोध केला. त्यामुळे या महिला बचत गटाने केडीएमसी प्रशासनाकडून रीतसर परवानगी घेऊन काल पुन्हा स्टॉल लावण्यास सुरुवात केले. परंतु पुन्हा या महिला फेरीवाल्यांनी त्यांना विरोध केला आणि त्यानंतर याठिकाणी मोठा वाद झाल्याचे दिसून आले. आम्ही इथे 20 वर्षांपासून बसत आहोत, आता तुम्ही कुठून आलात असा सवाल विचारत महिला फेरीवाल्यांनी बचत गटाच्या महिलांशी वाद सुरू केला.
या बचत गटाशी वाद घालणाऱ्या महिला फेरीवाल्यांमधील काही महिलांनी अचानक स्वतःच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेतला आणि पेटविण्याचा प्रयत्न केल्याने वातावरण आणखीनच चिघळले. अखेर केडीएमसी पथक आणि विष्णू नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ही परिस्थिती नियंत्रणात आणली.

दरम्यान या घटनेनंतर पुन्हा एकदा फेरीवाल्यांचा प्रश्न आणि त्यांची मुजोरी हा मुद्दा ऐरणीवर आल्याचे दिसत आहे.

Exit mobile version