Home ठळक बातम्या ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशिनबाबत कल्याण प्रांत कार्यालयातर्फे जनजागृती

ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशिनबाबत कल्याण प्रांत कार्यालयातर्फे जनजागृती

कल्याण दि.10 मार्च :
ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशिनबाबत असणारे गैरसमज दूर करण्यासाठी कल्याण प्रांत कार्यालयातर्फे जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार गेल्या 3 महिन्यांपासून भारत निवडणूक आयोग आदेशाप्रमाणे गेल्या 3 महिन्यांपासून आगामी लोकसभा निवडणुकीकरता ही जनजागृती मोहीम सुरू करणयात आली आहे.

सार्वजनिक ठिकाणे, शाळा महाविद्यालयात हा उपक्रम यापूर्वीच राबवण्यात आल्याचे कल्याणचे उपविभागीय दंडाधिकारी डॉ. नितीन महाजन यांनी सांगितले. दरम्यान कल्याण लोकसभा मतदारसंघातील सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसाठी शनिवारी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. ज्यात प्रत्यक्ष ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनच्या कार्यपद्धतीचे सखोल सादरीकरण करण्यात आले. तसेच मशीनच्या तांत्रिक, प्रशासकीय आणि सुरक्षेबाबतची माहिती, वैशिष्ट्य, मतमोजणी, मतदान प्रक्रिया आदीबाबत डॉ. महाजन यांनी माहिती दिली तसेच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसनही करण्यात आले. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय आधिकारी शिवाजी कादबाने यांच्या प्रमूख उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*