चार माजी नगरसेवकांचा शेकडो कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश
कल्याण डोंबिवली दि.11 नोव्हेंबर :
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘बाळासाहेबांची शिवसेना ‘ पक्षाच्या कल्याण डोंबिवलीतील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या नुकत्याच जाहीर करण्यात आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी डोंबिवली शहर आणि कल्याण ग्रामीणमधील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांपाठोपाठ कल्याण पूर्व आणि पश्चिमेच्या पदाधिकाऱ्यांचीही नियुक्ती जाहीर केली आहे. बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आणि खा. डॉ .श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी या नेमणूक कल्याण पूर्व – पश्चिम पदाधिकाऱ्यांच्या नेमणूका केल्या आहेत .
कल्याण पश्चिम – रविंद्र पाटील शहर प्रमुख, छाया वाघमारे – महिला जिल्हा संघटक कल्याण – ( कल्याण पूर्व – पश्चिम, उल्हासनगर, अंबरनाथ ), नेत्रा उगले – महिला शहर संघटक.
कल्याण पूर्व –
मल्लेश शेट्टी – उप जिल्हा प्रमुख, निलेश शिंदे विधानसभा प्रमुख, महेश गायकवाड – शहर प्रमुख, प्रशांत काळे – विधानसभा समन्वयक ( प्रशासकीय योजना ), विशाल पावशे आणि नविन गवळी – उपशहर प्रमुख .
डोंबिवलीत नवे पदाधिकारी
शरद गंभीरराव-सहसंपर्कप्रमुख, संतोष चव्हाण-डोंबिवली विधानसभा प्रमुख, उपशहरप्रमुख-संजय पावशे, जनार्दन म्हात्रे, हरिश्चंद्र पाटील, रणजित जोशी, अमित बनसोडे, गजानन व्यापारी, सुनील भोसले, राजेश मुणगेकर, दीपक भोसले, उपशहर संघटक- अण्णा राणे, सुदाम जाधव, संतोष तळाशीलकर, प्रकाश माने-कार्यालय प्रमुख, सागर बापट-सहकार्यालय प्रमुख, डोंबिवली मध्यवर्ति शहर शाखेचे जागा मालक जितेन पाटील यांच्यावर शहर समन्वयक पदाची जबाबदारी टाकण्यात आली आहे.
कल्याण ग्रामीण पदाधिकारी
कल्याण तालुका संपर्कप्रमुख-रमेश म्हात्रे, तालुका प्रमुख महेश पाटील, अर्जुन पाटील-तालुका संघटक, बंडू पाटील-सचिव, नितीन पाटील-संघटक, उपतालुका प्रमुख-गजानन पाटील, विकास देसले, उमेश पाटील, रवी म्हात्रे, विलास भोईर, राहुल गणपुले, गणेश जेपाल, उपकार्यालय प्रमुख-धर्मराज शिंदे, सहकार्यालय प्रमुख-सुनील मालणकर
चार माजी नगरसेवकांचा शेकडो कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश…
केडीएमसीच्या चार माजी नगरसेवकांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत वर्षा निवासस्थानी ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षामध्ये प्रवेश केला. यावेळी योगेश म्हात्रे, पूजा म्हात्रे, काँग्रेसचे दत्ता गिरी, गोरखनाथ जाधव या माजी नगरसेवकांचा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
कल्याण डोंबिवलीतील उध्दव ठाकरे समर्थकांना ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षात आणण्याचा सपाटा खा. डाॅ. शिंदे यांनी लावला आहे. यापूर्वीही अनेक नगरसेवकांनी शिंदे यांच्या गटात प्रवेश केला असून कल्याण डोंबिवली पालिकेच्या निवडणुकीपूर्वी शहर, कल्याण ग्रामीण भागातील अधिकाधिक मूळ शिवसैनिक ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षात आणण्यासाठी प्रयत्न होतील हे निश्चित.