Home क्राइम वॉच घरफोड्या करणाऱ्या रिक्षाचालकाला बाजारपेठ पोलिसांनी ठोकल्या बेड्या; 15 तोळे सोन्याचे दागीने हस्तगत

घरफोड्या करणाऱ्या रिक्षाचालकाला बाजारपेठ पोलिसांनी ठोकल्या बेड्या; 15 तोळे सोन्याचे दागीने हस्तगत

 

कल्याण दि.15 डिसेंबर :
बंद घरं हेरून त्यात चोरी करणाऱ्या गणेश  शिंदे (40,रा .टिटवाळा) या अट्टल चोरट्याला बाजारपेठ पोलीसांनी बेड्या ठोकल्या असून त्याच्याकडून 15 तोळे सोन्याचे दागीने हस्तगत केले आहे. तर त्याच्या दोन साथीदारांचा पोलीस शोध घेत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील यांनी दिली.

गेली काही महिन्यांपासून कल्याणच्या बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत दिवसा आणि रात्री घरफोडीच्या घटना वाढल्या होत्या. या गुन्ह्यांच्या तपासादरम्यान बाजारपेठ पोलिसांनी गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचत गणेशला अटक केली. गणेश हा रिक्षाचालक म्हणून काम करतो. पोलिसांनी त्याच्याकडून 2 लाख 25 हजार रुपये किंमतीचे 15 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केल्याचेही एसीपी उमेश माने पाटील म्हणाले. तर गणेशचे आणखी 2 साथीदार सिकंदर उर्फ किरण रमणीक शहा आणि मुन्ना यांचा पोलीस कसून शोध घेत आहेत.

ही कामगिरी बाजारपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र पतील, निरीक्षक राजेंद्र अहिरे, निरीक्षक सुनिल पवार, सु. श्री. खोत, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित मुंढे, हवालदार टी. के. पावशे, ए.जे. जातक, पोलीस नाईक एस.पी. साळवी, बी.आर.बागुल, पी.एम. बाविस्कर, आर.एम. सांगळे या पथकाने केली.

मागील लेखकल्याण डोंबिवली महापालिकेच्या 15 डिसेंबर रोजीच्या लसीकरण केंद्रांची माहिती
पुढील लेखकल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 24 रुग्ण तर 22 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा