Home ठळक बातम्या कपिल पाटील यांचा कल्याणात ‘मॉर्निंग वॉक’ आणि ‘चाय पे चर्चे’द्वारे मतदारांशी संवाद

कपिल पाटील यांचा कल्याणात ‘मॉर्निंग वॉक’ आणि ‘चाय पे चर्चे’द्वारे मतदारांशी संवाद

कल्याण दि.15 एप्रिल :
मतदानाला अवघ्या 2 आठवड्यांचा कालावधी उरला असताना राजकीय उमेदवार मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळी शक्कल लढवताना दिसत आहे. भिवंडी लोकसभेतील महायुतीचे उमेदवार खासदार कपिल पाटील यांनीही अशाच एका वेगळ्या प्रकारे कल्याण पश्चिमेतील मतदारांशी संवाद साधला. कल्याणच्या काळा तलाव परिसरात सकाळी सकाळी दाखल होत पाटील यांनी ‘मॉर्निंग वॉक’द्वारे मतदारांशी संवाद साधला.

राज्यातील निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात भिवंडी लोकसभेचे मतदान होत असून त्याला अवघे 14 दिवस उरले आहेत. त्यामूळे प्रचारासाठी आणि मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी राजकीय उमेदवारांकडे अत्यंत कमी कालावधी उरला आहे. त्यामुळेच मग वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवत कमी वेळात जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून भिवंडी लोकसभेचे उमेदवार खासदार कपिल पाटील यांनी सकाळी 7 वाजताच काळा तलाव परिसर गाठला आणि मॉर्निंग वॉक करीत नागरिकांशी मनमोकळा संवाद साधला. काळा तलाव परिसरात असणाऱ्या जॉगिंग ट्रॅकवर त्यांनी पूर्ण एक फेरी मारली. तर काळा तलाव येथील मॉर्निंग वॉक करून झाल्यावर जवळच्याच एका चहाच्या दुकानात चहा पित पित लोकांशी चाय पे चर्चाही केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*