Home ठळक बातम्या डोंबिवली एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग

डोंबिवली एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग

डोंबिवली दि.13 एप्रिल :
डोंबिवली एमआयडीसी फेज 1 मधील श्रीजी लाईफस्टाईल या कपड्याच्या कंपनीला आज रात्री 10.30 ते 11 च्या सुमारास आग लागली. या आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.

या आगीची माहिती मिळताच कल्याण डोंबिवली अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी 1 तासात ही आग आटोक्यात आणली. या आगीमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कंपनीचे मात्र मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*