Home ठळक बातम्या कल्याणच्या वाडेघर डम्पिंग ग्राऊंडला मोठी आग ; दुरून दिसताहेत धुराचे लोट

कल्याणच्या वाडेघर डम्पिंग ग्राऊंडला मोठी आग ; दुरून दिसताहेत धुराचे लोट

कल्याण दि.24 मार्च :
कल्याण पश्चिमेच्या वाडेघर डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याला आज संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास मोठी आग लागली आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नसून तरी ही आग इतकी मोठी आहे की दूरवरून धुराचे लोट दिसत आहेत. डम्पिंग ग्राऊंडवरील मोठ्या भागात ही आग लागली असून झपाट्याने पसरत असल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वीही याठिकाणी आग लागली होती.
याठिकाणी अग्निशमन दलाच्या 2 गाड्यांच्या माध्यमातून अग्निशमन दलाचे जवान आगीशी झुंजत आहेत.

 

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा