Home बातम्या बिर्ला कॉलेज शिवसेना शाखा आणि रवी पाटील फाऊंडेशनतर्फेही कोकणातील पूरग्रस्तांना मदत

बिर्ला कॉलेज शिवसेना शाखा आणि रवी पाटील फाऊंडेशनतर्फेही कोकणातील पूरग्रस्तांना मदत

 

कल्याण दि.2 ऑगस्ट :

कल्याण बिर्ला कॉलेज शिवसेना शाखा आणि रवी पाटील फाऊंडेशनच्या वतीने कोकणातील पूरग्रस्तांना मदत दिली जाणार आहे. मदतीचा ट्रक आज सकाळी बिर्ला कॉलेज शाखेच्या येथून कोकणाच्या दिशेने रवाना करण्यात आल्याची माहिती शिवेसना उपशहर प्रमुख आणि फाऊंडेशनचे अध्यक्ष रवी पाटील यांनी दिली.

कोकणातील पूराच्या संकटात अनेकांचे संसार पाण्याखाली बुडाले. त्यांना जीवनाश्यक वस्तूंची गरज आहे. त्याकरीता बिर्ला कॉलेश शिवसेना शाखा आणि रवि पाटील फाऊंडेशन यांच्या वतीने 21 जीवनाश्यक वस्तूंचे किट तयार करण्यात आले आहे. त्यासाठी अनिरुद्ध पाटील, स्वप्नील भोंबडे, भावेश पाटील, राम मुसळे, सौरभ आरोटे, निलेश मोरे, संकेत पाटील, दिलीप सातारकर आदी पदाधिका:यांनी यासाठी मेहनत घेतली आहे. मदत साहित्यात रेशन कीट, कपडे, औषधे आदी साहित्य पाठविले जाणार आहे. बिर्ला कॉलेज शिवसेना शाखेतून आज सकाळी हा मदतीचा ट्रक कोकणात रवाना करण्यात आला. हे साहित्य जवळपास 500 गरजूंना दिले जाणार आहे. महाड, खेड, पोलादपूर आणि चिपळूण येथील गरजूंनी ही मदत त्याठिकाणचे शिवसेना आमदार भरत गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली वाटप केली जाणार आहे.

 

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा