Site icon LNN

कल्याणातील पॅनल क्र. 7 मधील महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून आणा – भाजप पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

कल्याण दि.8 जानेवारी :
कल्याण पश्चिमेच्या पॅनल क्रमांक 7 मधील भाजप शिवसेना महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून आणण्याचे आवाहन भाजप पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना केले. अवघ्या आठवड्यावर येऊन ठेपलेल्या केडीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या पॅनेलमधील महायुतीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा नुकताच संपन्न झाला. (BJP leaders have appealed to voters to elect the Mahayuti candidates from Kalyan’s Panel No. 7 with a decisive majority.)

भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब, भाजपचे माजी नगरसेवक मंगेश गायकर, मंगेश गायकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या कार्यकर्ता मेळाव्याला शिवसेना उपनेत्या आणि उमेदवार विजया पोटे, हेमलता पवार, संदीप गायकर आणि शामल गायकर, माजी नगरसेवक अरविंद पोटे आणि भाजप पदाधिकारी पंकज उपाध्याय यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कल्याण पश्चिमेमध्ये आणि या प्रभागात माजी भाजप आमदार नरेंद्र पवार यांच्या कार्यकाळात, माजी नगरसेवक विजया पोटे, अरविंद पोटे तसेच माजी नगरसेवक संदीप गायकर यांच्या स्थायी समिती सभापतीच्या कार्यकाळात अनेक विकासकामे झाली आहेत. ही विकासकामे आपल्याला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक असल्याचे मत यावेळी भाजपाचे माजी नगरसेवक आणि सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक मंगेश गायकर यांनी यावेळी व्यक्त केले.

तर केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारकडून देशभरात आणि राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून विकासाची गंगा अवतरली आहे. कल्याण डोंबिवलीमध्येही केंद्र आणि राज्य सरकारचे अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू असून त्यामुळे कल्याण डोंबिवलीचा चेहरा मोहरा बदलणार आहे. ही कामे पाहता विकासासाठी भाजपा आणि शिवसेनेशिवाय याठिकाणी कोणताही पर्याय उपलब्ध नाहीये अशा शब्दांत भाजपा जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी महायुती उमेदवारांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. तसेच या महायुतीच्या चारही उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून आणण्याचे आवाहन पक्षाच्या कार्यकर्त्यांना केले.

Exit mobile version