Site icon LNN

बिनविरोध उमेदवार निवडून येण्याची भाजपची हॅट्ट्रिक; डोंबिवलीतून आणखी एक भाजप महिला उमेदवार बिनविरोध होणार

छाननीमध्ये विरोधी उमेदवाराचा अर्ज झाला बाद

डोंबिवली दि.31 डिसेंबर :
डोंबिवलीतून भाजपसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. आसावरी नवरे यांच्यापाठोपाठ त्याच पॅनेलमधील आणखी भाजप महिला उमेदवार रंजना मितेश पेणकर यांचीही बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. डोंबिवली पूर्वेतील पॅनल क्रमांक 26 ब मध्ये रंजना पेणकर यांच्या विरोधात उभ्या असलेल्या उमेदवाराचा अर्ज छाननीमध्ये बाद झाल्याने आता भाजपच्या बिनविरोध विजयी होणाऱ्या उमेदवारांची संख्या 3 झाली आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात..

Exit mobile version