Home ठळक बातम्या धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी कल्याणात भाजपच्या महिला आघाडीचे आंदोलन

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी कल्याणात भाजपच्या महिला आघाडीचे आंदोलन

कल्याण दि.18 जानेवारी :
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात कल्याणमध्ये भाजपच्या महिला आघाडीतर्फे जोरदार आंदोलन करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणी पाठीशी न घालता मुंडे यांचा राजीनामा घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली. कल्याणात पश्चिमेतील शिवाजी महाराज चौकात हे आंदोलन करण्यात आले.

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंवर एका महिलेने केलेल्या बलात्काराच्या आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे. अशातच भाजपनेही या मुद्द्यावरून महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी आणि शिवसेनेला धारेवर धरत हल्लाबोल केला आहे. याच मुद्द्यावर धनंजय मुंडे यांच्याविरोधात भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली होती. त्यानूसार भाजपच्या कल्याण महिला जिल्हाध्यक्ष रेखा राजन चौधरी यांच्या नेतृत्वाखाली अनेक महिलांनी आज कल्याणात आंदोलन केले. ‘धनंजय मुंडे हाय हाय’ची जोरदार घोषणाबाजी करीत मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा