Home बातम्या रायगड – रत्नागिरी जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी भाजपा युवा मोर्चाकडून मदत रवाना

रायगड – रत्नागिरी जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी भाजपा युवा मोर्चाकडून मदत रवाना

 

डोंबिवली दि. 2 ऑगस्ट :
महाड, पोलादपूर, खेड, चिपळूण परिसरात पूरपरिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहें. पुरामुळे घरातील सर्वच वाहून गेले असे अनेक ठिकाणी पहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी, आमदार रवींद्र चव्हाण ह्यांच्या पुढाकाराने, भाजयुमो कल्याण जिल्ह्याच्या माध्यमातून आवाहन करण्यात आले होते.

डोंबिवलीतील कुडाळदेशकर सहयोग संस्था, सर्वोदय लीला सोसायटी ह्यांच्या माध्यमातून पिण्याचे पाणी, धान्य किट ह्यासाठी सहकार्य मिळाले. आज पाठवलेल्या सामानात प्रामुख्याने ब्लॅंकेट, सॅनिटरी नॅपकिन्स, अँटीफंगल औषधे, रेडी टू इट खाद्यपदार्थ, स्लिपर्स, चटई आणि अन्नधान्य याचा समावेश आहे. हे मदत साहित्य पूरग्रस्त भागात वाटण्यासाठी युवा मोर्चा पदाधिकारी डोंबिवलीतुन आज रवाना झाले.
यावेळी भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, डोंबिवली ग्रामीण मंडल अध्यक्ष नंदू परब, युवामोर्चा जिल्हाध्यक्ष मिहिर देसाई, सचिव बाळा पवार, युवा मोर्चाचे अमित चिकणकर, मितेश पेणकर, समीर भंडारी, सत्येंद्र दुबे, राधिका पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

मागील लेखमनसे विद्यार्थी सेनेच्या वर्धनापन दिनानिमित 2 हजार मनसैनिकांचे मोफत लसीकरण
पुढील लेखकल्याणातील 1 हजार पूरग्रस्तांना शिवसेनेतर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा