Home ठळक बातम्या कल्याणात भाजपची विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याविरोधात निदर्शने

कल्याणात भाजपची विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याविरोधात निदर्शने

कल्याण दि.3 जानेवारी :

छत्रपती संभाजी महाराजांसंदर्भात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात कल्याण शहर भाजपने निदर्शने केली. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात माजी आमदार नरेंद्र पवार आणि शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने करण्यात आली. (Bjps Demonstration against Leader of Opposition Ajit Pawar in Kalyan)

नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांसंदर्भात वक्तव्य केले. ज्याचे पडसाद गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये उमटताना दिसत आहेत. कल्याण पश्चिमेतील छ्त्रपती शिवाजी महाराज चौकात ही निदर्शने करण्यात आली. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याविरोधात भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केल्याचे दिसून आले.

यावेळी भाजपच्या भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक माजी आमदार नरेंद्र पवार आणि भाजपचे कल्याण शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे यांच्यासह भाजपचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा