Home ठळक बातम्या महाविकास आघाडी सरकारविरोधात डोंबिवलीत भाजपचा जनआक्रोश मोर्चा

महाविकास आघाडी सरकारविरोधात डोंबिवलीत भाजपचा जनआक्रोश मोर्चा

 

डोंबिवली दि.18 नोव्हेंबर :
लाईट बिल माफ करण्यासह विविध मागण्यांसाठी डोंबिवलीत भाजपने जनआक्रोश मोर्चा काढत राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा निषेध केला. डोंबिवली शहर भाजपतर्फे पूर्वेतील दत्तनगर चौक ते इंदिरा चौकापर्यंत आमदार रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढला.

महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन 2 वर्षे झाली असून या काळात राज्य सरकारने सर्वसामान्य जनतेला रस्त्यावर आणण्याचे धोरण राबवल्याचा घणाघाती आरोप यावेळी आमदार रविंद्र चव्हाण यांनी केला. तसेच एकीकडे सार्वजनिक सेवा सुविधांचा बट्ट्याबोळ झाला असून सार्वजनिक आरोग्य सुविधाही वाईट अवस्थेत आहे, एसटीसारखी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडली असून वीज बिलांमध्येही भरमसाठ वाढ झाल्याचेही यावेळी भाजपतर्फे सांगण्यात आले. या सर्व मुद्द्यांचा आघाडी सरकारला जाब विचारण्यासाठी हा जन आक्रोश मोर्चा काढण्यात आल्याचे आमदार रविंद्र चव्हाण म्हणाले.

 

या मोर्चामध्ये भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर, मंदार हळबे, भाजप ग्रामीण महिला मोर्चाच्या अध्यक्ष मनीषा राणे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. तर मोर्चादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून महापालिका कार्यल्यासह प्रत्येक ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

१ कॉमेंट

  1. जन आक्रोश मोर्च्यात सामान्य जनतेला आमंत्रण नव्हतं की पांढरपेशी समाजात नाराजी आहे ? निवडणुकीच्या पार्शवभूमीवर इच्छुक उमेदवार आणि समर्थक यांचा सहभाग जन आंदोलन नक्की कोणासाठी कोणी केल हे समजलं तर बर वाटल असत.

Leave a Reply to Sandesh Prabhudesai प्रतिक्रिया रद्द करा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा