Home ठळक बातम्या तळोजामधील केमिकल कंपनीत स्फोट; कल्याण तालुक्यातील 14 गावांमध्ये हादरे

तळोजामधील केमिकल कंपनीत स्फोट; कल्याण तालुक्यातील 14 गावांमध्ये हादरे

 

तळोजा दि.29 ऑक्टोबर :

तळोजा एमआयडीसीत केमिकल वेस्ट नष्ट करणाऱ्या कंपनीत आज सकाळी भीषण स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता इतकी होती, की कल्याण तालुक्यातील तब्बल १४ गावांना भूकंपासारखे हादरे बसले. त्यामुळे ही कंपनी बंद करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.

तळोजा एमआयडीसीत मुंबई वेस्ट मॅनेजमेंट नावाची कंपनी असून या कंपनीत रासायनिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचं काम केलं जातं. आज सकाळी रसायनांनी भरलेले दोन ड्रम खड्डा खोदून त्यात टाकण्याचं काम सुरू होतं. यावेळी दोन केमिकल्सची रिऍक्शन झाल्यानं भीषण स्फोट झाला. या स्फोटामुळे अजस्त्र जेसीबी पोकलेन मशीनही उलटली. यात जेसीबी चालवणारा कामगार जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या स्फोटामुळे भेदरलेल्या ग्रामस्थांनी कंपनीत धाव घेत गोंधळ घातला. यानंतर स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासाह पोलीस, फायर ब्रिगेड यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. ही कंपनी परिसरातील गावांसाठी जीवघेणी ठरली असून ती बंद करण्याची मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली. तर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून दोषींवर कारवाईचं आश्वासन दिलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*