Home बातम्या श्री स्वामी समर्थ गुरुपीठ न्यू कल्याण केंद्रातर्फे आयोजित रक्तदान शिबीरात 30 जणांचे...

श्री स्वामी समर्थ गुरुपीठ न्यू कल्याण केंद्रातर्फे आयोजित रक्तदान शिबीरात 30 जणांचे रक्तदान

 

कल्याण दि.26 मे :
तेजोनिधी सदगुरु मोरेदादा यांच्या पुण्यतिथीनिमित्त अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वरअंंर्तगत न्यू कल्याण गांधारे केंद्रातर्फे नुकतेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आयकॉन प्लाझा येथे आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरात 30 जणांनी रक्तदान केले.

कल्याण पश्चिमचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या प्रमूख उपस्थितीत या रक्तदान शिबिराचा शुभारंभ झाला. यावेळी हम गया नही जिंदा है चित्रपटाचे दिग्दर्शक अभिषेक निकम यांच्यासह राजेंद्र कचरे, समर्थ वखरे सुभाष वाणी, रेखा म्हात्रे, संदिप आवारी, संजय कारभारी, विनोद राणे, हर्षल भंगाळे, सुषमा सहस्त्रबुद्धे, कदम, सुनील वायले यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. तर कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी या शिबिरात सहभागी रक्तदात्यांचा गौरव केला. अवघ्या 5 महिने आधी स्थापन झालेल्या न्यु कल्याण केंद्राचा हा पहिलाच उपक्रम होता. उल्हासनगर येथील शासकीय रुग्णालयाचे या शिबिराला सहकार्य लाभले.

या कार्यक्रमासाठी न्यु कल्याण केंद्राच्या स्वाती पाचघरे, वासंती महाजन, शितल खानविलकर, तृप्ती चव्हाण, लिंबानी, कविता चौधरी, संज्योत पाचघरे, एकनाथ दळवी, वर्मा, राजपुत, विवेक पत्रे, अभिषेक बोरसे, अक्षय अहिरेसह सर्व सेवेकाऱ्यांनी योगदान दिले

मागील लेखकेडीएमसीने कचरा व्यवस्थापन शुल्क तातडीने रद्द करावे – आमदार राजू पाटील यांची मागणी
पुढील लेखऑक्सिजन प्लांट उभारणीसाठी आमदार विश्वनाथ भोईर यांच्याकडून 1 कोटीचा निधी महापालिकेकडे वर्ग

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा